बालाजी रथ उत्सव बेटावद

बेटावदचे ग्रामदैवत मोठा व लहान बालाजी रथ उत्सव 


पुरातन काळापासून बेटावद येथे मोठे बालाजी व लहान बालाजी अशी दोन संस्थाने आहेत. संस्थानाच्यादरवर्षी  नवरात्रोत्सवास पहिला दिवसांपासून भगवान बालाजीचे वहन मिरवणूक बेटावद  विविध मार्गावरून काढण्यात येते. यात मोर, सिंह, हत्ती, गरूड, शेषनाथ, विमान, सूर्य, चंद्रमा, मारूती, सप्तमुखी घोडा आदी वाहनांचा समावेश आहे. मिरवणूक चालणाऱ्या या उत्सवाची विजयादशमीचा दुसऱ्या दिवशी संपूर्ण बेटावदच्या नावलौकिकात भर टाकणारा व पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या स्मरणात राहणारा रथोत्सव दरवर्षी उत्साहात संपन्न होतो. प्रचंड वजन व अत्यंत कसदार असे कोरीव काम असलेल्या काष्ठशिल्पाचा मोठ्या बालाजीचा रथ व लहान बालाजी चा रथ  बेटावदकर ग्रामस्थांचे ‘भूषण’ आहेत. 

   
मोठे बालाजी रथ बेटावद


लहान बालाजी रथ बेटावद 

No comments:

Post a Comment