पढावद बदल थोक्यात

महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पढावद हे गाव आहे




          पढावद गावापासून जिल्ह्याचे ठिकाण धुळे सुमारे 42 की.मी. अंतरावर आहे. तालुक्याचे ठिकाण शिंदखेडा सुमारे 25 की.मी. अंतरावर आहे.     


पढावद गावाचे क्षेत्रफळ सुमारे 617.01 हेक्टर आहे.



गावाचा पिन कोड 425403


 --------------------------------------------------


• बेटावद, पढावद, मुडावद या गावाची नावे कसे पडले ?


आख्यायिका*- 

         

     खूप वर्षापूर्वी एक जादुगार आपल्या मुलास घेऊन आला.त्याने शिकवलेली विद्या मुलाने बोलून दाखवावी म्हणून तो आपल्या मुलाला म्हणाला बेटा वद- म्हणजे बेटा  बोल तो मुलगा बोलत नव्हता. नंतर तो त्या मुलाला पढावद ला घेऊन गेला  व त्यास सांगितले पढा- म्हणजे शिकलेले आहे ते वद. तरी तो बोलला नाही तेथून मूडावदला नेले तेथेपण बोलला नाही. मांत्रिक ( जादूगर) संतापला व म्हणाला मूढावद -मूर्ख बोल, मूढावद चा अपभ्रंश होऊन  आजचे  मुडावद झाले.


________________________________________

                   माझ गाव माझ पढावद 


           पढावद हे पांझरा नदी काठावर वसलेले छोटेसे गांव. गाव जरी छोट असलं तरी किर्ती मात्र फार मोठी आहे.कारण निष्कपट, साध- सरळ, निर्मळ व पवित्र मनाच्या लोकांचे हे गाव आहे. या गाव चे लोक फक्त भोळे भाबळेच नही तर त्याबरोबर वर्तमानकाळातच्या प्रवाहाबरोबर चालणारे, चाणाक्ष, कुशाग्र व चौकस बुध्दीचे आहेत. प्रत्येक घरात शिक्षण व नौकरीच्या संदर्भात आपलं वेगळं विशेष स्थान म्हणून ओळखल्या जाणारेया या गावाचा घरापासून, मंदीरापासून तर राजकारणापर्यत एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. 


5 comments:

  1. अगदी बरोबर भाऊ

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर भाऊ

    ReplyDelete
  3. धन्यवाद आपली प्रतिक्रिया दिल्या बदल

    ReplyDelete
  4. गावाची माहीती आणखी टाकावी
    उदा.जि.प.शाळा,हायस्कुल असा प्रकाराची माहाती टाकावी.

    ReplyDelete
  5. Ho ya visyavr bolg lihnyace kam chalu aahe lavkarc bolg publish karnyat yeil

    ReplyDelete