श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर मुडावद-निम
धुळे व जळगाव जिल्हाच्या सिमेरेषेवर पांझरा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिर. या मंदिराला एक हजार वर्षापूवीचा इतिहास लाभलेला असल्याने या ठिकाणी कपिलमुनींनी तपश्चर्या करुण महादेवाची पिण्डीची स्थापना केली होती. यामुळे या मंदिराला कपिलेश्वर महादेव मंदिर हे नाव पडले आहे.या मंदिराचे बाधकाम 17 व्या शतकात झाले आहे.त्यानंतर थोरसमाज सेविका अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेखात आढळून येते.तर दिपमाळा जवळील दुसर्या शिलालेखात दादोजी नेवाडकर 1688 शके नाम संवत्सर असा उल्लेख आहेत. याठिकाणी 2005 मध्ये अखिल भारतीय संत संमेलन प.पु.हंसानंदजी महाराज यांनी घडवून आणले होते. यामुळे या मदिराची सर्वत्र देशभर किर्ती पसरलेली आहे. हेमांड पंथी बांधकाम, कोरीव नक्षीकाम हे उत्कृष्ठ शिल्पकलेचा नमूना असलेले 17 व्या शतकात कपिलेश्वर मंदिर उभारण्यात आल्याचे येथील शिलालेखात लिहीले आहे. खानदेशातील एकमेव मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपाची रचना आकर्षक असून दगडी सभामंडप, तिन्ही दिशांना प्रवेशद्वार आहे प्रत्येक मार्गावर अर्धमंडप आहे 16 दगडी स्तंभावर सभामंडप उभा आहे, मंदिराच्या समोर उंच दगडि दिपमाळा,समोरून वाहणारी तापी नदी, मंदिरा मागून पांझरा नदी, चहोबाजूला निसर्गरम्य वातावरण असे विलोभनीय वातावरण, मंदिराच्या गाभार्यात तिन शिवपिंडी असून सकाळ चे पाहिले सूर्य किरण मंदिरातून त्रिपिंडीवर पडते.
![]() |
कपिलेश्वर महादेव मंदिर छायाचित्र |
![]() |
तिन शिवपिंडी |
![]() |
दिपमाळा |
Nice
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete