आपले अवघे जीवन ज्यांनी वारकरी
संप्रदायाला अर्पण केले आहे असे *पडावदभूषण ह.भ.प. अरुण बापूजी* यांना संपूर्ण समाज
एक सच्चा विठ्ठल भक्त वारकरी म्हणून ओळखतो.
गेली चाळीस वर्षे श्री.अरुणबापू परिसरातील किर्तन,भजन, सप्ताह,दिंडी
या सर्व गोष्टींचे अविभाज्य घटक आहेत. महाराष्ट्रातील असे एकही किर्तनकार
नसतील ज्यांचा श्री.बापूंशी परिचय नसेल. एक प्रकारे *वारकरी संप्रदायाचे पडावद
गावचे प्रतिनीधी* म्हणून महाराष्ट्र बापूंना ओळखतो. त्यांच्या या कार्याची कोठेतरी
दखल घेतली जाणे अपेक्षित होतेच. म्हणूनच *खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे* या
मंडळातर्फे आदरणीय बापूंना *ज्येष्ठ वारकरी* पुरस्कार जाहीर करण्यात आला. काल दि.
18 डिसेंबर 2022 रोजी धुळे येथे एका भव्य दिव्य समारंभात श्री. बापूंना
सन्मानपूर्वक *ज्येष्ठ वारकरी* पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने पडावद
गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे! *ज्येष्ठ वारकरी पुरस्कार
प्राप्त ह.भ.प.श्री.अरुणबापूजी* यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी
शुभेच्छा! *रामकृष्ण हरी!!!!*
No comments:
Post a Comment