• बैल पोळा
गावची आर्थिक बाजु पूर्णपणे शेतीवर अवलंबून. शेती म्हणजे बैलजोडी आलीच, शेतकरी व त्याचे जीवाभावाचे सहकारी बैल यांचा जीवाभावाचा सण म्हणजे बैल पोळा. पोळा गावामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. गावातील सर्व शेतकरी आपापले बैल सजवुन वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.
शेतकरी आपले बैल घेऊन वरचे गाव हनुमान मंदिर ते खालचे गाव मारोती मंदिर पर्यंत घेवून जातात.
गावातील सर्व ग्रामस्थ चावडी चौक येऊन बैल पोळा पाहण्यासाठी एकत्रित येतात.
देव दर्शन करुन शेतकरी राजा आपल्या बैलासोबत आपापल्या घरी रवाना होतात. बैलांना गोड पोळीचा नैवद्य दिला जातो.
यांत्रिक युगामध्ये दिवसेंदिवस बैलांचे प्रमाण जरी कमी होत चालले असले तरी गावाने पोळ्याची व बैलांच्या प्रती कृतज्ञता दाखवण्याची ही परंपरा मोठ्या दिमाखात जपली आहे.
•अखंड हरी नाम सप्ताह
भक्तीचीपरंपरामहाराष्ट्रालापूर्वापकाळापासून चालत आलेली आहे, त्याचप्रमाणे गावात हि परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे.
पढावद गावात अखंड हरीनाम सप्ताहाची पंरपरा खूपच जुनी आहे.आज पर्यंत सुरु आहे. पूर्वी श्री.ह.भ.प.अरुण बापू यांच्या घरासमोर सप्ताहाचा कार्यक्रम होत असे.पुढे काळातराने हा सप्ताहा हनुमान मंदिर वरचे गाव येथे हलविन्यात आला.आणि येथे अखंड हरीनाम सप्ताहा चालू आहे.
गावाची चावडी वरती (गावाच्या मध्यभागी) भव्य असे विठ्ठल मंदिर बांधकाम करण्यात आले. सण 2011मंदिरमध्ये विठ्ठल रुख्मिणी, मूर्तीचे प्राणप्रतिष्ठान मंदिर मध्ये करण्यात आलेली आहे.तेव्हा पासून मंदिर च्या वाढदिवस निमित्ताने गावात दुसऱ्या अखंड हरीनाम सप्ताचे सुरुवात करण्यात आली.
या दोन्ही अखंड हरीनाम सप्ताह मध्ये आठ दिवसामध्ये महाराष्ट्रतील नामवंत कीर्तनकारचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. रोजसकाळी 5ते 6 काकळा आरती व संध्याकाळी 5ते 6 हरीपाठ, रात्री 9 ते 11 कीर्तनाच्या कार्यक्रम सातव्यादिवशी संध्याकाळी संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात येथे.आठव्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.
•गणेशोत्सव व नवरात्रीत्सव
विखुरलेल्या लोकसमुदाय एकत्र येईल विचारांची देवान घेवाण होईल आणि त्यातुन समाजाला विकासाची,उत्कर्षाची दिशा मिळेल या उदात्त ध्येयाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरवात केली.
हेच ध्येय समोर ठेवून गावात मंडळे गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व हर्ष उत्सवा त साजरा करतात. गावामध्ये विघ्नराज ग्रुप , श्री माऊली गणेश मित्र मंडळ, शिवराजे गणेश मित्र मंडळ, शिव सिद्धी मित्र मंडळ, आदिवासी गणेश मित्र मंडळ, वीर एकलव्य मित्र मंडळ ही मंडळे गणेशोत्सवाचे आयोजन दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने करतात. सर्व मंडळाच्या मिरवणुका निघतात परंतु कोणत्याही प्रकारचे वाद विवाद, तंटे न होता मिरवणुका सुरळीत पार पाडल्या जातात. सर्व मंडळे एकमेकांना सहकार्य करतात.
सिद्धीविनायक ग्रुप नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा होतो. सूंदर अशी विद्युत रोशनाई करुन घटस्थापनेला देवीची स्थापना केली जाते. रोज विविध सामाजिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे
आयोजन केले जाते, दांडियांचे आयोजन केले जाते. दसर्याच्या दिवशी मातेची मिरवणूक निघते नंतर विसर्जन होते. गावातील आबाल वृद्ध या कार्यक्रमाचा लाभ घेतात.दरवर्षी नवरात्रोत्सव या मंडळाकडून साजरा होतो.
•पढावद गावातील यात्रा उत्सव
खूपच छान प्रकारे माहिती दिली आहे.
ReplyDeleteगावाच्या सण उत्सवची थोडक्यात पण खूपच छान माहिती आहे
धन्यवाद 🙏
Deleteपवन खरंच कौतुकास पात्र आहे.
ReplyDeleteमाहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पढावद गावाची जागतिक ओळख निर्माण करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न. करत आहे
ReplyDeleteधन्यवाद 🙏