आंबा प्रेमी आम्ही पढावदकर !
पहिले प्रेम, पहिला पाऊस अशा पहिल्यावाहिल्या गोष्टीतली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, मोसमातला पहिला आंबा.आंबा आला आला म्हणता त्याची शोधा शोधा करून मोसमामतल ते पाहिलं फळ खाण्याचा आनंद म्हणजे शब्दात व्यक्त करूच शकत नाही !
कडकडीत उन्हाने जाळणाऱ्या एप्रिल-मे मध्ये सुखद गोष्ट एकच पिवळधम्मक रसाळ आंबा एका बाजूला उन्हाच्या कडक उन्हाचे हे महिने नकोसे वाटतात. पण आंबाच्या गोडसर मधुर सुगंधाची आठवण झाली की वर्षभर एप्रिल मेच असावेत अस वाटत पण मोसमतल्या पहिल्या आंब्याची गोडी काही वेगळीच असते.
जानेवारीपासूनच आम्ही पढावदकर त्याची वाट बघत असतात.फेब्रुवारी नुकताच आठवणी कासावीत होण्यास जातो. मार्चमध्ये कुठे कोण्याच्या शेतातील आंबे आलेले यांची शोधा शोधा सुरु होते. आणि सरतेशेवटी ते स्वर्गीय फळ हातात पडत त्या गोड रसाचा पाहिलं थेंब म्हणजे अमृत असते. या आंबा गोडी फक्त आंबाप्रेमी आम्ही पढावदकर ! यांना व पढावद गावाचे आंबे खाण्याऱ्यालाच माहिती आहे.
No comments:
Post a Comment