पढावद गावात बैलपोळा सण साजरा
पढावद विशेष : ता.18 ऑगस्ट 2020
देशात व महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यापासून कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्यासोबत जीवाचे रान करणाऱ्या सर्जा राज्याचा पोळा सण कोरोना व आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यानी साजरा केला.
शेती मशागतीसाठी अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परिणामी बैलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. बैलजोडीऐवजी आता ट्रॅक्टरचा वापर सुरू झाल्याने पारंपरिक बैल जोडी दुर्मिळ होत चालली आहे.
कोरोनाचे सावट घेऊन शेतकऱ्यांनी यंदाचा पोळा सण कसाबसा साजरा केला.पण उत्साह दरवर्षी असतो तो यंदा दिसला नाही.
•मारोती मंदिर प्रदक्षणा परंपरा•
मारोती मंदिराचे पोळ्याला दिवशी अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या दिवशी आपल्या साथीदाराला अर्थात बैलराजाला अंगावर झुल, गळ्यात गुंगरू, शिंगणा रंगवून-सजवून घेऊन येतात. वरचे गाव मारोती मंदिर ते खालचे गाव मारोती मंदिर या मारुती मंदिराला प्रदक्षणा घालून सर्व बैलांना वाजत-गाजत मिरवणुकीसाठी घेऊन जातात. ही मिरवणूक पाहण्यासाठी सर्व जण गावच्या चावडी चौकात येतात. बच्चे कंपनीसाठी ही मिरवणूक मोठी औत्सुक्याची असते. ठीक ठिकाणी महिलांकडून या बैलराजाची पूजा करून त्याला पुरणपोळीचा नैवैध चारला जातो.
No comments:
Post a Comment